Site icon सक्रिय न्यूज

वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर केंद्राचा राज्यांना निर्वाणीचा इशारा…….!

वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर केंद्राचा राज्यांना निर्वाणीचा इशारा…….!

नवी दिल्ली दि.३१ –  देशभरात कोरोनाचा कहर वाढला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट अत्यंत धोकादायक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. कोरोना आताच सक्रिय झाला आहे. वेळीच कठोर उपाययोजना करा, नाही तर पायाभूत सुविधा उद्ध्वस्त होतील, असा इशाराच केंद्राने राज्यांना दिला आहे.

गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत मार्चमध्ये कोरोना 38 टक्क्याने वाढला आहे. कोरोना रेट पहिल्यांदा ऑक्टोबरनंतर 5 टक्क्यांच्यावर गेला आहे. कोरोना ज्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे देशाच्या पायाभूत सुविधांना त्याचा मोठा फटका बसू शकतो, असं केंद्राने म्हटलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यांना तात्काळ रुग्णालयातील सुविधा वाढवणे आणि इंटेसिव्ह केअर वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच कोरोना रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्यासही सांगण्यात आलं आहे. गेल्या काही आठवड्यातच परिस्थिती खराब झाली आहे. ही चिंतेची बाब आहे. काही राज्यांनी टेन्शन वाढवलं आहे. अशावेळी कोणतंही राज्य किंवा जिल्हा चिंतेचं कारण बनता कामा नये, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितलं.

दरम्यान जिथे नॅशनल पॉझिटीव्हीटी रेट 5.65 टक्के आहे, तिथे महाराष्ट्रात हा रेट 23 टक्के आहे. पंजाबमध्ये 8.82 टक्के, मध्यप्रदेशात 7.82 टक्के, तामिळनाडूत 2.50 टक्के आणि कर्नाटकात 2.45 टक्के आहे. 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासोबत केंद्र सरकारची उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी पाच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात कोरोना टेस्टिंग वाढवा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, आयसोलेशन, लसीकरणाची संख्या वाढवा आणि क्लिनिकल ट्रीटमेंटवर लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे.

शेअर करा
Exit mobile version