Site icon सक्रिय न्यूज

असंघटित, बांधकाम मजूर नोंदणीची व्यवस्था तालुकास्तरावर करा – डिवायएफआय

असंघटित, बांधकाम मजूर नोंदणीची व्यवस्था तालुकास्तरावर करा – डिवायएफआय
अंबाजोगाई दि.३१ – अंसघटीत कामगार ,बांधकाम कामगार  या वर्गासाठी शासनाने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी दरवर्षी या कामगारांना नोंदणी करणे आवश्यक असते.अंबाजोगाईत हा कामगार हजारोच्या संख्येने आहे, परंतू यांची नोंदणी करण्याची सोय फक्त जिल्हाच्या ठिकाणी आहे. त्यामुळे सदरील नोंदणी व्यवस्था तालुकास्तरावर करण्याची मागणी डीवायएफआय च्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
             नोंदणीसाठी कामगारांना पैसे खर्च करून बीड ठिकाणी 100 किमी प्रवास करून जावे लागते. या त्रासामुळे बीड जिल्हयातील असंघटीत कामगार ,बांधकाम कामगार नोंदणी अत्यंत कमी झाली आहे. याचकारणामुळे शासनाच्या लाभापासुन हे कामगार वंचित राहत आहेत.असंघटीत कामगार ,बांधकाम मजुर नोंदणी ची सोय तालुकास्तरावर अंबाजोगाईत करून दया, जेणेकरून शासन योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत. तसेच सदरील योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या स्तरावर उपाय योजना कराव्यात व त्वरीत मिळण्याची सोय करावी. यासह इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी प्रशांत मस्के, जगन्नाथ पाटोळे, देविदास जाधव, सुहास चंदनशिव, अभिमन्य माने उपस्थित होते.
योजना भरपूर, पण अंमलबाजावणीच नाही……….!
राज्यात वर्षभरात अनेक बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला. कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये, नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये, अंत्यविधीसाठी 10 हजार रुपये, कामगारांच्या विधवा पत्नीस महिन्याला 2 हजार रुपये देण्याची तरतुद कामगार कल्याण मंडळाने केलेली आहे. सध्या कामगार कल्याण मंडळाकडे 10 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पडून आहे. मात्र 10 वर्षात मंडळाने 2 हजार कोटीही खर्च केलेले नाहीत. राज्यात सध्या शेकडो बांधकाम कामगारांचा मृत्यू झालेला आहे. त्यांची कुटुंबं हलाखीचं जीवन जगत आहेत. तसेच राज्यात 23 लाखांहून अधिक बांधकाम कामगारांची नोंद आहे. परंतु नुतनीकरण आणि नोंदणीच न झाल्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
शेअर करा
Exit mobile version