Site icon सक्रिय न्यूज

मुंडेवाडीतील चौदा जणांवर केज पोलीसात गुन्हा दाखल…….!

मुंडेवाडीतील चौदा जणांवर केज पोलीसात गुन्हा दाखल…….!
केज दि.३१ – आमच्या शेतातील बांधावरून का आलास व जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात झालेल्या मारहाणी प्रकरणी तालुक्यातील मुंडेवाडी येथील चौदा जणांवर केज पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
              तालुक्यातील सुनील श्रीमंत मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक श्यामराव मुंडे, सुग्रीव श्यामराव मुंडे, दादासाहेब बाबासाहेब मुंडे, श्रीमंत कोंडीबा घोळवे, बायजाबाई श्यामराव मुंडे, मंदाकीनी सुग्रीव मुंडे सर्व रा. मुंडेवाडी ता. केज यांनी दि.३० मार्च रोजी साडेपाच च्या सुमारास मुंडेवाडी शिवारातील सुग्रीव मुंडे याचे शेता शेजारी असलेल्या नंबर बांधावर वरील सहा जणांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन फिर्यादी व फिर्यादीचे वडील श्रीमंत मुंडे त्यांचे शेताकडे जात असताना यातील अशोक श्यामराव मुंडे याने तुम्ही आमच्या शेताच्या बांधवरुन का आलात अशी भांडणाची कुरापत काढुन फिर्यादीचे वडीलांना दगड फेकुन मारुन कपाळावर दुखापत केली. तर फिर्यादीस डोक्यात पाठीमागुन दगड मारुन दुखापत केली. व इतर पाच जणांनी फिर्यादीस व साक्षीदार यांना काठीने,दगडाने लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच अशोक याने परत बांधावर आलात तर जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिली.
         सदर प्रकरणी केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना बाळू सोनवणे हे करत आहेत.
           दरम्यान दादासाहेब बाबासाहेब मुंडे रा. मुंडेवाडी ता. केज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  श्रीमंत ज्ञानोबा मुंडे, सुनिल श्रीमंत मुंडे, चंद्रकांत श्रीमंत मुंडे, आश्विनी चंद्रकांत मुंडे, सिंधुबाई श्रीमंत मुंडे, अशोक बाबु चौरे, नाना अंकुश तोगे, मोतीराम भाउराव पंडीत सर्व रा.मुंडेवाडी यांनी दि.३० रोजी साडेपाच च्या दरम्यान गैरकायदयाची मंडळी जमवुन जुने भांडणाची कुरापत काढुन फिर्यादीस शिवीगाळ केली. मात्र फिर्यादीने शिवीगाळ का करता असे विचारले असता चंद्रकांत मुंडे याने फिर्यादीचे डोक्यात दगड मारुन दुखापत केली. तसेच इतर आरोपीतांनी फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने काठीने मारुन मुकामार दिला. तर मोतीराम पंडित याने तंगडे तोडा अशी धमकी दिली.
          सदरील प्रकरणी केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील पोलीस नाईक श्री. सानप हे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version