केज दि.31- तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील शेतकरी अमोल अनंत राऊत (32) या तरुणाने आपल्या वडीलाच्या कर्जबाजारी पणाच्या नैराश्यातून बुधवारी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
मागच्या अनेक दिवसांपासून वडिलाच्या कर्जबाजारीपणा बद्दल कुटूंबियात चर्चा होत होती. त्याच्यामुळे आलेल्या नैराश्यातून अमोल अनंत राऊत याने बुधवारी सर्व्हे नं.10/4 मधील हुरा नावाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात थकलेले आई वडील, पत्नी, 2 मुली,1 मुलगा असा परिवार असून घरातील कर्ता माणूस गेल्यामूळे राऊत कुटुंब उघड्यावर पडले आहे.