पुणे दि.१ – कर्मचारी निवड आयोगाने जीडी कॉन्स्टेबल पदासाठी मोठी भरती आयोजित केली आहे. २५ मार्च २०२१ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सुमारे ४० हजार पदे भरली जाणार आहेत. पदांचा तपशील लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांचे वय किमान १८ ते कमाल २३ वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत देण्यात येणार आहे. २५ मार्च पासून १० मे पर्यंत अर्ज भरता येतील.तर संगणक आधारित परीक्षेची तारीख – २ ते २५ ऑगस्ट असेल.
दरम्यान या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे करण्यात येणार आहे.एसएससी जीडी कॉन्स्टेबलला दरमहा २१,७०० ते ६९,१०० रुपये वेतन देण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.