केज दि.1 – तालुक्यातील कोरेगाव येथे एका नऊ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
केज तालुक्यातील कोरेगाव येथे दि.१ एप्रिल गुरुवार रोजी दुपारी १:३० वा. लव्हुरी रस्त्या लगतच्या सगजनी नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात अभिषेक बाबासाहेब तादंळे वय (९ वर्ष) या बालकाचा त्यांच्याच मालकीच्या घराजवळील विहरीत पडून मृत्यू झाला. अभिषेक विहिरीत पडला त्यावेळी जवळ कोणी नसल्यामुळे त्याचा जीव वाचू शकला नाही.
दरम्यान मागील महिन्यात अशाच प्रकारे ३ मार्च रोजी विहिरीत पडलेल्या १५ वर्षीय वैभव लांब या मुलाचा प्राण अंगणवाडी मदतनीस उर्मिला पायाळ- शिनगारे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविला होता.
अभिषेक तांदळे याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद सीआरपीसी १७४ नुसार केज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.