Site icon सक्रिय न्यूज

सोनीजवळा पाणीपुरवठा योजना सुरुळीत करा अन्यथा आत्मदहन करू – मिनाज पटेल……! 

सोनीजवळा पाणीपुरवठा योजना सुरुळीत करा अन्यथा आत्मदहन करू – मिनाज पटेल……! 
केज दि.२ – तालुक्यातील सोनी जवळा गाव मागच्या 18 महिन्यांपासून पाण्यासाठी भटकंती करत आहे. पाणी साठा मुबलक प्रमाणावर असूनही केवळ पाईपलाईन नादुरुस्त असल्याने गावाला निर्जळीचा सामना करावा लागत आहे. मात्र येत्या दोन आठवड्यात पाणी पुरवठा सुरुळीत नाही केला तर आत्मदहन करण्याचा इशारा जागरूक गावकऱ्यांनी ग्रामपंचायत ला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
                       सोनीजवळा येथील पाणीपुरवठा मागील 18 महिन्यांपासून बंद आहे.यासाठी केजचे तहसिलदार पासुन ते गावच्या ग्रामपंचायत पर्यंत निवेदन देऊनही प्रशासनाला जाग आलेली नाही. सोनीजवळा गावातील लोकाचे पाण्यासाठी बेहाल होत आहेत. विशेषतः वृद्ध महिला व लहान मुले पाण्यासाठी दूरवर पायपिट करत आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाने या निवेदनाची दखल घेतली नाही तर दि.16/04/2021 रोजी तालुक्यातील कोणत्याही शासकीय कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा समाजिक कार्यकर्ते मिनहाज पटेल, गोविंद ससाणे, दादासाहेब ससाणे, प्रकाश भांडवलकर यांनी यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे..
शेअर करा
Exit mobile version