केज दि.२ – तालुक्यातील होळ येथे दि.1 रोजी सायंकाळी पाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे अचानक शेतातील घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याने संसार उघड्यावर आला आहे.
होळ येथील आश्रूबा गोविंद गोपाळघरे यांचे पत्र्याचे व कुडाचे घर होते.मात्र घरातील सर्व लोक शेतात कामाला गेल्याच्या दरम्यान सायंकाळी पाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे घराला अचानक आग लागली. ते जवळपास कोणी नसल्याने सदरील आग लवकर विझवण्यात न आल्याने घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. कांही वेळाने घरातील लोक आले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही. यामध्ये घरातील सर्व संसारीक वस्तू , ठिबक, लाखोचा कांदा, शेतातील अवजारे इत्यादी जळून गेल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे.
दरम्यान संबंधित तलाठी यांनी पंचनामा केला असून कुटुंबीयांनी तात्काळ मदतीची मागणी केली आहे.