केज दि.२ – घराच्या अंगणात झोपलेल्या एका २३ वर्षीय महिलेच्या जवळ येऊन नराधमाने लज्जास्पद बोलून विनयभंग केल्याची घटना केजमध्ये १ एप्रिल रोजी मध्यरात्री १ ते १.३० वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी केज पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या उन्हाळ्याच्या दिवसात घरात उकाडा होत असल्याने केजमधील एक २३ वर्षीय महिला ही १ एप्रिल रोजी रात्री नेहमीप्रमाणे घरासमोरील अंगणात झोपली होती. मध्यरात्री १ ते १.३० वाजेच्या सुमारास ती भर झोपेत असल्याची संधी साधून आरोपी शिवाजी भारत काळे ( रा. केज ) हा पीडित महिलेजवळ आला. त्याने लज्जास्पद कृत्य केल्याने महिला झोपेतून जागी झाली. त्यानंतर लज्जास्पद कृत्य करीत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा करताच तिच्या कुटुंबातील व्यक्ती झाले. त्यानंतर शिवाजी काळे याने पीडिता व तिच्या घरच्या व्यक्तींना शिवीगाळ करीत तुम्ही जर माझी तक्रार केली तर तुम्हाला जिवे मारुन टाकीन अशी धमकी देऊन पळून गेला. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून आरोपी शिवाजी भारत काळे याच्याविरुध्द केज पोलीसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे पुढील तपास करत आहेत.