पांडुरंग केंद्रे/अंबाजोगाई
अंबाजोगाई दि २ – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विविध रखडलेली कामे व नाविन्यपूर्ण विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. ना. मुंडेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाटोदा, गेवराई , माजलगाव, केज, अंबाजोगाई व परळी या पंचायत समित्यांच्या निवासी इमारतीचे रुपडे पालटणार असुन सभापती, अधिकारी, कर्मचारी तसेच निवासी इमारतीच्या बांधकामासाठी २कोटी ८५लाख रुपये ग्रामविकास विभागामार्फत मंजुर करुन जिल्हा प्रशासनास वितरीत करण्यात आला आहे.
सन २०२०-२१अर्थसंकल्पातुन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवासी इमारतींच्या बांधकामासाठी करण्यात आलेल्या तरतुदीमधुन सदर कामांना मंजुरी देण्यात आली.
याअंतर्गत पाटोदा पंचायत समितीस रु २५ लाख, गेवराई पंचायत समितीस ७०लाख, केज पंचायत समितीस ५०ला , अंबाजोगाई पंचायत समितीस ३०लाख तसेच परळी, माजलगाव पंचायत समितीस प्रत्येकी ४५ लाख रु सभापती व अधिकारी, कर्मचारी निवास्थाने व बांधकाम उपकामांसाठी मंजुर करण्यासाठी आले आहेत.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे २६ जानेवारी २०२१ जिल्हा वासीयांना उद्देशुन केलेल्या भाषणातून कोविड विषयीचे अर्थिक निर्बंध जसेजसे तसतसे जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक काम हाती घेतली जातील असे आश्वासन दिले होते.
त्यानुसार धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील रुग्णालये, न्यायालये आदि पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील६ पंचायत समितीच्या निवासी इमारतीच्या बांधकामासाठी २कोटी८५लाख निधी प्राप्त झाल्याने इमारतीचे रुपडे पालटणार आहे.