केज दि.३ (प्रतिनिधी) येथील उपजिल्हा रुग्णालयात लस देण्यात येत आहे. मात्र शहरापासून हे रुग्णालय लांब असल्याने वयोवृध्द लोकांना येण्या जाण्याचा त्रास होत आहे. तरी शहरात एक लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे व पशुपतीनाथ दांगट यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
केज मध्ये शासनाचे जे लसीकरण केंद्र आहे ते शहरापासून जवळपास २.५० की मी अंतरावर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात आहे. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य लोकांना तिथे जाणे सहज शक्य नाही. अनेक अडचणींचा सामना करून त्या ठिकाणी पोहचावे लागते. त्यामुळे शहरात एक लसीकरण केंद्र सुरू करावे जेणे करून शहरातील सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांची सोय होईल. अशी मागणी केज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे व पशुपतीनाथ दांगट यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच याबाबत जिल्हाधिकारी यांना देखील या संदर्भात पत्र पाठवण्यात येणार असल्याचेही ठोंबरे यांनी सांगितले.