या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत संकेतस्थळ indianairforce.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 3 एप्रिल 2021 पासून सुरु झाली आहे. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 2 मे 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्जाची तारीख संपल्यानंतर, अधिकृत वेबसाईटवरून ही लिंक काढली जाईल.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम वायु सेना भर्ती बोर्ड indianairforce.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. मुख्यपृष्ठावरील भरती(Recruitment) विभागात जा. त्यामध्ये, “APPLICATION FOR THE POST OF — AND CATEGORY” या लिंकवर क्लिक करा. यामध्ये ग्रुप सी(Group C) पर्यायावर जाऊन नोंदणी करा. नोंदणी फॉर्म डाउनलोड करा. त्याचवेळी, अधिसूचनेत दिलेल्या सूचनांनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत अर्ज प्रक्रिया चालू राहते.
यामध्ये वेस्टर्न एअर कमांड – 362, दक्षिणी हवाई कमांड – 28, ईस्टर्न एअर कमांड – 132,सेंट्रल एअर कमांड- 116, देखभाल कमांड – 479, प्रशिक्षण कमांड – 407, हाऊस किपिंग स्टाफ (महिला स्कॅव्हेंजर) – 345, कुक – 124, एमटीएस (मल्टी टास्किंग स्टाफ) – 404,एलडीसी – 53, स्टोअर कीपर – 15, हिंदी टायपिस्ट – 12, चालक – 49 इत्यादी पदांची भरती होणार आहे.
पदांसाठी किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे आहे. ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना पाच वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये 10 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. निवड होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेस हजेरी लावावी लागते. लेखी चाचणी शैक्षणिक गुणवत्तेवर आधारीत असेल. या लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, न्युमेरिकल अॅप्टीट्युड, जनरल इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस या विषयांचा समावेश असेल. हा पेपर हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत येईल.