मुंबई दि.४ – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनबद्दल महत्वाचं वक्तव्य केलं आहे. लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण लावावेच लागले तर दोन दिवस आधी सांगितलं जाईल, जेणेकरून कोणी अडकून राहणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण लावावेच लागले तर दोन दिवस आधी सांगितले जाईल, जेणेकरून कोणी अडकून राहणार नाही. पुण्यात ज्या पद्धतीने निर्बंध लागू करण्यात आले आहे तसेच निर्बंध सर्वत्र लागू करण्याची अनेकांची मागणी आहे. त्याबाबत उद्या सोमवारी 8 वाजता निर्णय होईल, असं अजित पवार म्हणालेत.आताची लाट वेगळी आहे, घरात एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह होत आहे. ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी सरकारचा प्रयत्न आहे, असं अजित पवार म्हणालेत.
दरम्यान पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता नाही. पंढरपूरमध्ये केंद्र सरकारने निवडणूक लावलेली आहे. त्यामुळे ते क्षेत्र अपवाद आहे. केरळ, बंगालमध्ये ही निवडणुका आहेत तर तिथे निर्बंध का नाहीत असा सवाल कार्यकर्ते विचारत आहेत, पण नियम पाळून प्रचार करावा, अशी सूचना अजित पवारांनी दिली आहे.