केज दि.६ – घरासमोर उभ्या असलेल्या ४० वर्षीय महिलेस तू मला आवडतेस म्हणत विनयभंग केला. तर पीडितेचा भावाच्या डोक्यात लोखंडी खिळी मारून डोके फोडत पती व मुलाला मारहाण केल्याची घटना केज तालुक्यात घडली. या प्रकरणी केज पोलिसात दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील ४० वर्षीय महिला ही ५ एप्रिल रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास घरासमोर उभी होती. याचवेळी आरोपी सत्यप्रेम दगडु केदार याने या महिलेेेचा वाईट हेतुने हात धरून तू मला आवडतेस म्हणत विनयभंग केला. हे पाहून पीडितेचा भाऊ मदतीला धावून आल्याने त्याच्या डोक्यात लोखंडी खिळी मारून त्याचे डोके फोडले. तर पीडितेचा पती, मुलगा हे लागलेले भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना आकाश दगडु केदार, रुक्मीण दगडु केदार, आरुशा सत्यप्रेम केदार यांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण करून मुक्कामार दिला. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सत्यप्रेम केदार, आकाश केदार, रुक्मीण केदार, आरुशा केदार ( सर्व रा. गप्पेवाडी ता. केज ) यांच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक बाळू सोनवणे हे पुढील तपास करत आहेत.