Site icon सक्रिय न्यूज

सर्व कार्यालयांमध्ये मिळणार कोरोनाची लस……..!

सर्व कार्यालयांमध्ये मिळणार कोरोनाची लस……..!

बीड दि.७ – देशात सध्या झपाट्याने होत असलेला संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत. लसीकरणाला गती देण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून कोरोना लसीकरण त्वरेने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर राज्यांनी सर्व कार्यालयांमध्ये (खासगी असो की सरकारी) कोरोनाची लस देण्यास सांगितले आहे. वयाची मर्यादा केवळ 45 वर्षे असेल, परंतु आता लसीकरणामध्ये गती येण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या आदेशानुसार, प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज किमान 100 लोकांना लस देण्यात यावी.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालया ने कोरोना विषाणूची चाचणी बदलली आहे आणि नमुना चाचणी फॉर्ममध्ये नवीन स्तंभ जोडला आहे. या स्तंभात, कोरोना चाचणी दरम्यान, लोकांना लसी बद्दल माहिती द्यावी लागेल आणि आतापर्यंत त्यांना ही लस मिळाली आहे की नाही ते सांगावे लागेल.

शेअर करा
Exit mobile version