Site icon सक्रिय न्यूज

चालत्या अँबुलन्स ने घेतला पेट, कळंब शहरातील घटना……!

चालत्या अँबुलन्स ने घेतला पेट, कळंब शहरातील घटना……!
कळंब दि.८ – कळंब शहरातील ढोकी रोडवरील कृष्णा हॉस्पिटल च्या रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला मात्र कांही नागरिकांच्या लक्षात आल्याने व गाडीत कुणी रुग्ण नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
          कळंब शहरातील कृष्णा हॉस्पिटलची रुग्णवाहिका बार्शी येथे रुग्ण सोडून परत येत होती असे सांगण्यात आले. मात्र शहरातील येरमाळा रोडवर वरील महावितरण कार्यालयासमोर आली असता गाडीने समोरील भागातून धूर निघत असल्याचे कांही नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी चालकास कल्पना दिली व तात्काळ गाडी थांबवण्यास सांगितले.
          दरम्यान गाडी उभी करून आजूबाजूला असणाऱ्या सतर्क नागरिकांनी आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली.मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले असून गाडीत कुणी रुग्ण नसल्याने मोठा अनर्थ टळला. सदरील घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली.
अग्निशमन दलाची गाडीही घटनास्थळी दाखल झाली होती मात्र तोपर्यंत नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले होते.
शेअर करा
Exit mobile version