Site icon सक्रिय न्यूज

जि.प.शाळेचे शिक्षक झाले ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण…….!

धारुर दि.८ – तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा कासारी या शाळेतील प्राथमिक शिक्षक  विक्रम हनुमंत नाईकनवरे हे डिसेंबर 2020 मध्ये  घेतलेल्या सेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी शिक्षणशास्त्र या विषयात सेट परीक्षा दिली होती व ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
मुळातच विद्यार्थीप्रिय, उपक्रमशील, स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करणारे व तंत्रज्ञानाची उत्तम जाण असणारे शिक्षक म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे.
                      नोकरीच्या अवघ्या 10 वर्षात त्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत म्हणूनच त्यांच्या शाळेच्या गावात त्यांना विषेश मान दिला जातो.
                          या यशाबद्दल त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व सर्व सहकारी शिक्षक तसेच परिसरातील अनेक मित्र मंडळी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यशाचे श्रेय त्यांनी सहकारी शिक्षक श्री. बनसोडे, स्टाफ तसेच कुटुंबीयांना दिले आहे.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version