Site icon सक्रिय न्यूज

सावत्र आईने केला मुलाचा खून…….!

सावत्र आईने केला मुलाचा खून…….!
गेवराई दि.९ – तालुक्यातील लुखामसला येथे सावत्र आईने मुलाचा खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.८) रात्री घडली.याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तिघाजणांविरोधात शुक्रवारी (दि.९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                    लुखामसलाचे रहिवासी असलेले भगवान डोमाळे यांना दोन पत्नी असून सात अपत्य आहेत.यापैकी पाडूरंग भगवान डोमाळे (वय-३८) यांचा जागेच्या वादातून डोक्यात कु-हाड घालुन सावत्र आई,तिचा सख्खा मुलगा आणि मुलाच्या मुलाने मिळून खून केला. याप्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात रेणुका भगवान डोमाळे (वय-५०),वैजिनाथ भगवान डोमाळे (वय-४०) व योगेश वैजिनाथ डोमाळे (वय-२०) यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मारेकरी फरार असून याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे हे करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version