Site icon
सक्रिय न्यूज

केज उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण दोन दिवस राहणार बंद…….!

केज उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण दोन दिवस राहणार बंद…….!
केज दि.१० – शहरातील उपजिल्हा रुग्णालयात मागच्या कांही दिवसांपासून लसीकरण सुरू आहे.मात्र सध्या लसीचा साठा उपलब्ध नसल्याने दोन दिवस लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी दिली आहे.
           केजच्या उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत 5470 नाकरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 701 लोकांना दुसराही डोस देण्यात आला आहे. मात्र लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद झाले आहे.
त्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी लसीकरण कार्यक्रम बंद करण्यात आला असून नागरिकांनी या दोन दिवसांत लसीकरणासाठी येऊ नये असे आवाहन डॉ. संजय राऊत यांनी केले असून लवकरात लवकर लसीचा साठा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहितीही राऊत यांनी दिली आहे.
          दरम्यान जास्तीतजास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणास अडथळे निर्माण होत आहेत.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version