मुंबई दि.१३ – “महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल”, असं मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख यांनी दिली. ते मु्ंबईत पत्रकारांशी बोलत होते.
अस्लम शेख म्हणाले, “गेल्या आठवड्यापासून आपण मीटिंग घेऊन सर्व विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात घेत आहोत. टास्क फोर्सशी चर्चा झाली. आपण लोकांचीही मतं जाणून घेत आहोत. ब्रेक द चेन यानुसार आज निर्णय होईल. लॉकडाऊन करणे गरजेचं आहे. मुंबई शहरामध्ये किंवा या राज्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त टेस्ट केल्या आहेत. त्यामुळे केस जास्त आहेत. साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करावं लागणार आहे. त्याबाबत नियमावली आज जाहीर होणार आहे. परप्रांतियांना आपण घरी जाण्यासाठी अडवत नाही, असंही अस्लम शेख यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन असू शकतो, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. राज्यातल्या परप्रांतिय कामगारांनी महाराष्ट्र सोडू नका. तुमची सगळी काळजी राज्य सरकारकडून घेतली जाईल. महाविकास आघाडी सरकार आणि कामगार मंत्री म्हणून महाराष्ट्र तुमची काळजी घेईल याच आश्वासन देतो, असं मुश्रीफ म्हणाले.
दरम्यान परप्रांतिय नागरिकांनी गर्दी करून रेल्वे स्टेशन, बस स्थानकांवर गर्दी करू नये. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. लॉकडाऊन 12 ते 13 दिवसांचा असू शकतो, असं मुश्रीफांनी सांगितलं.