केज दि.१३ – तालुक्यातील दरडवाडी येथील एक २२ वर्षीय तरुण त्याच्या किराणा दुकानासमोर उभा असताना गावातीलच एकाने त्या ठिकाणी येऊन विनाकारण शिवीगाळ करत मारहाण करून डोके फोडल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील दरडवाडी येथील
ऋत्विक भिमराव डोईफोडे (२२) हा तरुण २२ मार्च रोजी सकाळी ८ ते साडेआठ दरम्यान त्याच्या किराणा दुकानासमोर उभा होता. त्यावेळी गावातीलच प्रदिप मधुकर दराडे हा तेथे आला व शिवीगाळ करू लागला. यावरच तो न थांबता त्याने ऋत्विक च्या डोक्यात काठीने व दगडाने मारहाण केल्याने त्याचे डोकेही फुटले व गंभीर दुखापत झाली.
दरम्यान ऋत्विक डोईफोडे याच्या फिर्यादीवरून केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस जमादार मुकुंद ढाकणे हे करत आहेत.