Site icon सक्रिय न्यूज

ठरलं….. उद्या रात्री आठ वाजल्यापासून पंधरा दिवस महाराष्ट्रात संचारबंदी…….!

ठरलं….. उद्या रात्री आठ वाजल्यापासून पंधरा दिवस महाराष्ट्रात संचारबंदी…….!

मुंबई  दि.१३ – महाराष्ट्रात वाढता कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून पंधरा दिवस राज्यात कलम 144 लागू केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू ठेवली आहे पण ती फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच वापरता येईल. सकाळी सात ते रात्री 8 पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सुरू राहतील.

वैद्यकीय सेवा देणारे, वाहतूक करणारे व्यक्ती, आरोग्य क्षेत्राशी निगडित सर्व लोक यांना या संचार बंदीच्या काळात मुभा देण्यात आली आहे. तसेच इतर नागरिक 15 दिवस विनाकारण घराबाहेर पडू शकणार नाहीत. पत्रकारांनाही या संचारबंदीतून वगळण्यात आल आहे.

लवकरच मुख्यमंत्री संपूर्ण संचारबंदीचे आदेश जाहीर करणार आहेत. उद्या रात्री आठपासून हे संचार बंदीचे आदेश संपूर्ण महाराष्ट्रात लागू असणार असून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक असल्याने त्यांना निवडणूक होईपर्यंत या संचारबंदीतुन वगळण्यात आल आहे. तसेच ई-कॉमर्स सेवा सुरू राहणार आहे व हॉटेल व्यवसायिक फक्त ऑनलाइन सेवा देऊ शकतात.

1. महाराष्ट्र राज्यात उद्यापासून संपुर्ण संचारबंदी. 3.सकाळी सात ते रात्री आठ अत्यावश्यक सेवा
144 कलम पंधरा दिवसांसाठी लागू. 2.कामाशिवाय बाहेर पडता येणार नाही.
4. अत्यावश्यक सेवा सुरु व अत्यावश्यक सेवेसाठी बस लोकल प्रवासी वाहतूक सुरु.
5. अत्यावश्यक सेवेची वाहतूक सुरु. 6. पाळीव प्राण्यांची आवश्यक दुकाने सुरु 7.बँका, पेट्रोल पंप, सुरु राहणार 8.अधिस्विकृतिधारक पत्रकारांना मुभा 9.रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्रेत्यांना पार्सल सेवेची परवानगी
10. उत्पादन सेवेतील उद्योग सुरु राहतील. 11. गरीबांना 3 किलो गहु एक किलो तांदूळ प्रति व्यक्ती देणार.
12. शिवभोजन थाळी मोफत देणार. 13. विविध योजनातील अनुदान प्रत्येकी 1 हजार आगाऊ देणार.
14. बांधकाम मजुरांना व नोंदणीकृत घरगुती कामकारांना आर्थिक मदत.
15. अधिकृत फेरीवाल्यांना दिड हजार रुपये
देणार
16. अधिकृत रिक्षाचालकांना दिड हजार रुपयांची मदत.
17. अधिवासी कुटूंबाना 2 हजार मदत.

 

शेअर करा
Exit mobile version