Site icon सक्रिय न्यूज

ऑनलाइन पद्धतीने होणार कॉन्स्टेबल पदांची भरती…….!

ऑनलाइन पद्धतीने होणार कॉन्स्टेबल पदांची भरती…….!

नवी दिल्ली दि.15 – कर्मचारी चयन आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून  केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांमध्ये कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे. सीमा सुरक्षा बल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF),इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP), सशस्त सीमा बल (SSB),नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी(NIA ) आणि सचिवालय सुरक्षा बल (SSF)आसाम रायफल्समधील भरती प्रक्रियेबाबत नोटिफिकेशन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाईल, अशी माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशननं दिली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर याविषयी माहिती देण्यात आली आहे. या भरतीसाठी 2 ऑगस्ट ते 25 ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होईल,अशी शक्यता आहे.

10 वी उत्तीर्ण उमेदवार करु शकतात अर्ज……!

स्टाफ सिलेक्शन कमिशननं जाहीर केलेल्या परीक्षांच्या कॅलेंडरनुसार 10 मेपर्यंत जीडी कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करता येणार आहेत. 10 वी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड कॉम्प्युटर आधारित टेस्ट, शारीरीक क्षमता, मेडिकल टेस्ट याच्या आधारावर केली जाणार आहे.

अशी होईल निवड प्रक्रिया…….!

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जीडी कॉन्स्टेबल पदासाठी 55915 जागांवर भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये 47582 जागा पुरुष उमेदवारांसाठी तर 8333 जागा महिला उमेदवारांसाठी ठेवण्यात आल्या असतील. 2018 मध्ये 60210 मध्ये पदांसाठी भरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्याचा निकाल जानेवारी 2021 मध्ये जाहीर झाला होता. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची प्रथम कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा घेतली जाईल. त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. शारीरीक क्षमता चाचणी घेतल्यानंतर मेडिकल चाचणी घेण्यात येईल.

         दरम्यान जीडी कॉन्स्टेबल पदासाठी 21700-69100 इतक वेतन दिलं जाते. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक असून त्याचं वय 18 ते 23 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये सामान्यज्ञान, गणित, हिंदी आणि इंग्रजी, तार्किक क्षमता याविषयी प्रश्न विचारले जातात. यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये परीक्षा फी आहे. तर, महिला, एससी, एसटी आणि माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नाही.

शेअर करा
Exit mobile version