Site icon सक्रिय न्यूज

केज मध्ये संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी लोकांचा मुक्त संचार…….!

केज मध्ये संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी लोकांचा मुक्त संचार…….!
केज दि.१५ – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांसाठी कडक निर्बंध लादले आहेत. मात्र यामध्ये कांही दुकानांना सूट दिल्यामुळे खरदेसाठी लोक मोठया प्रमाणावर रस्त्यावर दिसून येत असल्याने संचारबंदीचे उल्लंघन होत आहे.
         बुधवारी दि.१४ च्या रात्री 8 वाजलेपासून संचारबंदी ला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी शहरातील किराणा दुकाने, कृषी दुकाने, बेकरी, पेट्रोल पंप, फळांचे गाडे सुरू आहेत. तर भाजीपाला विक्रेतेही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दुकाने लावून बसलेले आहेत. त्यामुळे उघड्या दुकानातून खरेदी करण्यासाठी सकाळपासून लोक बाहेर पडत आहेत. तर वाहतूक सुरू असल्याने सर्वच वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू आहे.
         शहरातील मेन रोड, कानडी रोड तसेच इतर भागात लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दिसून येत आहेत. याच बरोबर दवाखाने, मेडिकल्स, लॅब, बँका उघड्या असल्याने ग्राहकांची आवकजावक दिसून येत आहे.
           दरम्यान अत्यंत महत्वाच्या कामाशिवाय कुणालाही बाहेर पडता येणार नाही असे जरी आदेश असले तरी महत्त्वाचे काम ठरवायचे कसे ? हा प्रश्न आहे. कारण ज्याकांही आस्थापना सुरू आहेत तेथे खरदेसाठी खेड्यापाड्यातूनही लोक शहराकडे येताना दिसत आहेत.
शेअर करा
Exit mobile version