केज दि.१७ – केज शहरातील कळंब रोडवर असलेल्या शिवभोजन योजनेचा लाभ हा शहरात फिरणाऱ्या गरजू व निराधार लोकांना होत असून लॉक डाउन च्या काळात त्यांच्या पोटात चार घास घालण्याचे काम शिवसेना तालुकाध्यक्ष रत्नाकर शिंदे यांच्या माध्यमातून होत आहे.
शहरात फिरणारे निराधार लोक शहरातील कुठल्यातरी हॉटेल समोर जाऊन पोटाला मागून खातात. मात्र सध्या लॉक डाउन मध्ये सर्व हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.तसेच अन्य गरजू लोकही खाण्यासाठी इतरत्र भटकत असतात. काम बंद असल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आलेली आहे.
मात्र शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रत्नाकर शिंदे चालवत असलेल्या कळंब रोडवरील येडेश्वरी शिवभोजनालयातून अश्या गरजू लोकांना भोजन मोफत मिळत असल्याने गोरगरिबांच्या आणि निराधार व्यक्तींच्या पोटात चार घास जात आहेत.