Site icon सक्रिय न्यूज

कोरोनाचा संसर्ग हवेतून होतो का ? डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली महत्वाची माहिती……..!

कोरोनाचा संसर्ग हवेतून होतो का ? डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली महत्वाची माहिती……..!

मुंबई दि.१८ – इंटरनॅशनल हेल्थ रिसर्च जर्नल लान्सेटने मोठा दावा केला आहे. लान्सेटने कोरोना हवेतून पसरतो असे सांगितले आहे. लान्सेटच्या या दाव्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. यावर आयसीएमआरचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोरोना प्रसाराचे दोन मार्ग आहेत हे आपण पहिल्या दिवसापासूनच सांगतोय. एक प्रकार हा ड्राप्लेट इन्फेक्शन म्हणून जातो. तर दुसरा प्रकार हा एरोसॉल म्हणून जातो. एरोसॉल प्रकार हा साधारणत: हॉस्पिटलमध्ये होण्याची शक्यता असते. एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया करताना किंवा त्याला एन्सथेशिया देताना रुग्णाच्या घशात आपण जी नळी घालतो तेव्हा एरोसालद्वारे लागण होण्याती शक्यता आहे, असं डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितलं आहे.

एखादा रुग्ण शेजारी असला, तो शिंकला तर त्याच्या शिंकेच्या थेंबामधूनच संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. याबाबत हवेतून कोरोना संसर्ग होतो अशा ज्या स्टडी आहेत त्यावर फारसा विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही, असं गंगाखेडकर म्हणालेत.

दरम्यान, लान्सेटच्या अहवालात जूनमध्ये दर दिवशी 2300 लोकांचा मृत्यू होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावरही रमण गंगाखेडकर यांनी भाष्य केलं.हा अहवाल वेगळा आहे. हे मॉडेलिंग स्टडी आहे. या अशा स्टडिजमध्ये वेगवेगळे अंदाज बांधून रिपोर्ट तयार केला जातो. तो रिपोर्ट खराच ठरेल असं खात्रीलायकपणे सांगता येत नाही. आपण त्यातून एकच अर्थ काढू शकतो. याच गतीने मृत्यू दर सुरु राहीले. तर तेवढ्या आकड्याचे मृत्यूदरही होण्याची शक्यता आहे, असंही रमण गंगाखेडकर यांनी म्हटलं आहे.

शेअर करा
Exit mobile version