केज दि.१८ – तालुक्यात दररोज कोरोना रूग्नात वाढ होत असल्याने मौजे पिसेगाव कोव्हीङ सेंटर व शारदा इंग्लिश स्कुल येथे कोरोना रूग्नाची व्यवस्था केलेली आहे. त्यांना वेळेवर जेवण मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. सदरील घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळुक व केज तालुका शिवसेना प्रमुख रत्नाकर शिंदे यांनी भेट देऊन तात्काळ व्यवस्था करण्याची मागणी केली. अन्यथा शिवसेना स्टाईलने धडा शिकवू असा इशाराही दिला.
केज शहरातील शारदा कोव्हीड सेंटर मध्ये जेवणाची व पाणी व्यवस्था ची सोय होत नसल्याची तक्रार सचिन मुळुक व तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्याकडे कांही रुग्णांनी केली होती.त्यानुसार शारदा इग्लिश स्कुल व पिसेगाव कोव्हीङ सेंटर ला भेट देऊन रूग्नाची दुपारी तिन वाजता विचारपुस केली. यावेळी रूग्णांना वेळेवर आंघोळीला पाणी नाही, दररोज दुपारी तिन वाजताही जेवण मिळत नाही असा तक्रारीचा पाढा रुग्णांनी वाचला.
दरम्यान मुळुक यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, सिव्हिल सर्जन,अधिक्षक यांना फोन करून तक्रार केली. तसेच जेवण पुरवठा करत असलेल्या ठेकेदाराची भेट घेऊन त्याला धारेवर धरले. यावेळी ठेकेदाराने कामगार मिळत नसल्याचे उत्तर दिले. तयामुळे रूग्नाची हेळसांड प्रशासनाने थांबवली नाही तर शिवसेना स्टाईल ने धडा शिकवू असा इशारा देत केज तालुक्यातील शिवसैनिकाना लक्ष ठेवण्याचे आदेश दिले.
चार दिवसांपासून हीच बोंब…….!
पिसेगाव येथील कोविड केअर सेंटर ची इमारत कमी पडू लागल्याने शारदा इंग्लिश स्कूल मध्ये दुसरे कोविड केअर सेंटर मागच्या चार दिवसांपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र दोन्हीकडे बीड येथील सोनी नामक जेवणाचा ठेकेदार असल्याने पिसेगाव येथील रुग्णांना जेवण दिल्यानंतर किमान पाच किमी अंतरावर असलेल्या शारदा शाळेकडे पाठवत आहे. मात्र पिसेगाव येथेच सुमारे पावणे दोनशे रुग्ण असून तिथेच रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नाही. आणि तिथे जेवण दिल्यानंतर इकडे पाठवायचे म्हणजे दुपार होऊन जाते. सदरील ठिकाणी चहा, नाष्ठा, जेवण एकही दिवशी वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्ण रोज करत असले तरी ठेकेदाराने लक्ष न दिल्याने रुग्णांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.