केज दि.१९ – मध्यंतरी कांही दिवस लसीचा तुटवडा होता. मात्र आता केज उपजिल्हा रुग्णालयात कोविशील्ड लसीचे 400 डोस उपलब्ध असून ज्यांचा पहिला व दुसरा डोस घ्यायचा राहिला असेल त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात येऊन लसीकरण करून घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी केले आहे.