Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील रुग्ण वाढत असलेली गावे स्वयंस्फूर्तीने लावणार जनता कर्फ्यू, तर शहरात मोकाट फिरणाऱ्यांची होणार अँटीजन टेस्ट…….!

केज दि.२० – जिल्ह्यासह कोरोना रुग्णांचा आलेख तालुक्याही मोठ्या प्रमाणावर होत आहे. तालुक्यातील अनेक गावांत दिवसेंदिवस वाढतच आहेत. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या संसर्गामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील ज्या गावात रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत त्या गावातील लोक स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लावण्याच्या तयारीत आहेत.
             राज्य सरकारने संचारबंदी चे आदेश लागू केलेले आहेत. परंतु बहुतांश लोक याला न जुमानता विनाकारण बाहेर फिरत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे जे लोक नियम पाळत आहेत त्यांच्यातही भीतीचे वातावरण पसरले आहे. गावात वाढत चाललेला आकडा नियंत्रणात आणण्यासाठी सोनी जवळा सारख्या गावाने मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई सारखा उपक्रम राबवला आहे.
                तालुक्यातील आडस, मस्साजोग, युसुफ वडगाव, चिंचोली माळी यासह अन्य कांही गावात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परंतु आता यावर नियंत्रण आणण्यासाठी ज्या गावांत रुग्ण संख्या जास्त आहेत ती गावे दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याच्या तयारीत असून स्थानिक पातळीवर याचे नियोजन करण्यात येत आहे.
         तर केज शहरातही संचाबंदी असतानाही लोक विनाकारण रस्त्याने फिरत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढत चालला आहे. प्रशासनाच्या वतीने नियम पाळण्याचे आवाहन करत असले तरी त्याला लोक जुमानत नाहीत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत माजलगाव आणि आष्टी शहरात जशी मोकाट फिरणाऱ्या लोकांची अँटी जन टेस्ट करण्यात आली तशीच कारवाई केज शहरातही राबवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी सक्रीय न्युजशी बोलताना दिली. तर तहसीलदार मेंडके व गविअ श्री.दराडे हे ग्रामीण भागाचा दौरा करून ग्रामस्थांना नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत. नुकताच त्यांनी सोनी जवळा, युसुफ वडगाव, बनसारोळा यासह अन्य गावांना भेटी देऊन स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच ते नियमित ग्रामीण भागातील गावांना भेटी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेअर करा
Exit mobile version