बीड दि. 20- आज जाहीर करण्यात आलेल्या 4108 कोरोना अहवालात जिल्ह्यात 1024 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 122 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाई 231, आष्टी 111 , बीड 206 , धारूर 50 , गेवराई 45 , केज 122, माजलगाव 50 , परळी 101 , पाटोदा 47, शिरूर 46 , वडवणी 15 असे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये तालुक्यातील आडस या गावात 21 रुग्ण आढळून आल्याने डोकेदुखी वाढली आहे. तर मस्साजोग, युसुफ वडगाव सह ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर रुग्ण आढळून आले आहेत.