बीड दि.२० – राज्य शासनाने विषाणुमुळे होणा-या कोविड १९ या साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासुन लागु केला आहे. आणि याच अनुषंगाने बीड जिल्हा प्रशासना मार्फत कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कार्यवाही सुरु असुन विविध उपाययोजनांद्वारे कोविड- १९ साथरोगास आळा घालण्यासाठी आरोग्य विभाग काम करीत आहे.
जिल्हयातील DCH, DCHC, CCC Facility Nodal Officer यांना बेड उपलब्धतेची माहिती तात्काळ अपडेट करण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या जिल्हयामध्ये कोविड रुग्ण मोठया प्रमाणात सापडत आहेत. नातेवाईकांना हॉस्पिटल निहाय बेडची उपलब्धता माहिती नसल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी बरीच धावपळ करावी लागते. यामध्ये बराच वेळ जात असुन रुग्णांना उपचार मिळण्यास विलंब होत आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता जिल्हयातील सर्व रुग्णांना कोविड हॉस्पिटल निहाय बेडची उपलब्धता Real Time मध्ये आवश्यक आहे. त्यासाठी Covid beed Portal तयार करण्यात आले असुन त्यामध्ये प्रत्येक Facility Nodal Officer यांनी प्रत्येक एक तासाला बेड उपलब्धतेची माहिती उपरोक्त पोर्टल वर कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा व दिरंगाई न करता अपडेट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत.