Site icon सक्रिय न्यूज

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग, केज पोलिसांत गुन्हा दाखल……! 

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग, केज पोलिसांत गुन्हा दाखल……! 
केज दि.२१ –  तालुक्यातील एका गावात शेतात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून केज पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                 केज तालुक्यात माहेरी राहत असलेली महिला दि. २० एप्रिल रोजी शेतात शेळ्या चारण्यासाठी गेली असता धर्मा नागरगोजे (रा.सारूळ) नावाच्या इसमाने तिचा वाईट हेतूने डावा हात धरून झटापट करत विनयभंग केला. तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्या फिर्यादी वरून केज पोलिस ठाण्यात धर्मा नागरगोजे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी सानप हे करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version