मुंबई दि.२३ – सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे.
सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित दिव्यांग शाळा-विशेष शाळा, कर्मशाळा, मतिमंद बालगृहे येथील 4899 शिक्षक व 6159 अन्य कर्मचाऱ्यांना हा सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. मागील मागील महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत घोषणा केली होती, सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात विविध त्रुटी दूर केल्या असून, या 11 हजार 58 शिक्षक-कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2016 पासूनचा सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी दोन महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात घोषणा केली होती, त्यानुसार ही घोषणा महिनाभरातच प्रत्यक्षात उतरवून दिव्यांग शाळांतील 11 हजार 58 शिक्षक-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा शासन निर्णय निर्गमित केल्याने, राज्यभरातील शिक्षक-कर्मचारी संघटनांनी धनंजय मुंडे व सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले आहेत.