वडवणी दि.२४ – शहरासह तालुक्यातील हजारो नागरिकांना कोरोना महामारी मध्ये, अपघात प्रसंगी व इमर्जन्सी पेशंटला 108 रुग्णवाहिका अभावी जिल्हा व इतर ठिकाणी हलवण्यासाठी अडचणी निर्माण होतात व योग्य वेळी उपचार मिळत नाहीत, यामुळे रात्री-अपरात्री रुग्णांची त्यांच्या नातेवाईकांशी व नागरिकांची मोठी गैरसोय होते आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी वडवणी तालुक्यासाठी तात्काळ स्वतंत्र 108 रुग्णवाहिका मंजूर करून तात्काळ व्यवस्था करा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बीड जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे करण्यात आली आहे.
कोरोना सारख्या जागतिक महामारी मध्ये रुग्णांना 108 साठी चार – चार घंटे वाट पाहावी लागत आहे तर अनेकदा खाजगी वाहनांचा आधार घेवा लागत आहे. तालुक्यातील रुग्णांची होणारी हेळसांड व त्यांच्या जीवाची होणारी परवड थांबवण्यासाठी तात्काळ 108 रुग्णवाहिका उपलब्ध करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गीते सर, व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राठोड सर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बीड जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड मोहन जाधव, ऋषिकेश कलेढोन, संगमेश्वर आंधळकर आदीं उपस्थित होते.