Site icon सक्रिय न्यूज

सतत वाफ घेतल्याने घसा आणि फुफ्फुसांमधील नळीला त्याची झळ लागू शकते…….!

सतत वाफ घेतल्याने घसा आणि फुफ्फुसांमधील नळीला त्याची झळ लागू शकते…….!

बीड दि.26 – कोरोनापासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय  करत आहेत. कोरोना पॉझिटीव्ह लोक कोरोना बरा होण्यासाठी तर, ज्यांना कोरोना झाला नाही ते कोरोनापासून वाचण्यासाठी कितीतरी प्रकराच्या वस्तुंचा वापर करीत आहेत. कोरोनापासून बचावण्यासाठी सांगितला जाणार एक उपाय म्हणजे वाफ घेणं. लोक दिवसातून खूप वेळा वाफ घेतात. तर, हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठीही याचा वापर होतोय.

पण कोरोनावरच्या या तथाकथित उपायावर एका व्हिडीओने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. वाफ घेण्याने कोरोना बरा होण्यापेक्षा तुम्हाला गंभीर आजाराला समोरं जावं लागेल असं या व्हीडियोमध्ये सांगितलेलं आहे. यूनिसेफ इंडियाने आपल्या ट्विटर हॅंडलवर अपलोड केलेला हा व्हिडीओ आता चर्चेचा विषय आहे. स्टीम घेतल्याने कोणते साईडइफेक्ट होऊ शकतात याची माहिती न घेता ते घेणाऱ्यांना जागृत करण्यासाठी हा व्हिडीओ बनवण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये, युनिसेफ दक्षिण आशियाचे प्रादेशिक सल्लागार आणि बाल आरोग्य तज्ञ पॉल रुटर यांनी वाफ घेतल्याने कोरोना मरतो हे कुठेच सिद्ध झालेलं नाही असं सांगितलं आहे.

युनिसेफ दक्षिण आशियाचे प्रादेशिक सल्लागार आणि बाल आरोग्य तज्ज्ञ पॉल रुटर सांगतात कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी वाफ घेत असाल तर, त्याचे वाईट परिणामही होऊ शकतात. सतत स्टीम घेतल्याने घसा आणि फुफ्फुसांमधील नळीला त्याची झळ लागू शकते. त्यामुळे घशाची जळजळ होते किंवा श्वाससोच्छवासाला त्रास होऊ शकतो. या परिस्थितत व्हायरस देखील आपल्या शरीरात अगदी सहज प्रवेश करू शकतो. म्हणजेच,या व्हिडिओनुसार, जागतिक आरोग्य संघटना कोरोनावर उपचार म्हणून स्टीम घेण्याची शिफारस करत नाही हे स्पष्ट होत आहे.

शेअर करा
Exit mobile version