Site icon सक्रिय न्यूज

‘ते’ इंजेक्शनस तात्काळ ताब्यात घेऊन गरजूंना वाटप करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश……!

‘ते’ इंजेक्शनस तात्काळ ताब्यात घेऊन गरजूंना वाटप करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश……!

(प्रतिकात्मक फोटो)

औरंगाबाद दि.२६ – अहमदनगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट दिल्लीवरुन चार्टर्ड विमानाने तब्बल 10000 रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा अहमदनगरच्या नागरिकांसाठी आणला होता. परंतु आता सुजय विखे यांच्या अडचणीत वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. कारण या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हस्तक्षेप केला आहे.

सुजय विखे यांनी 10000 रेमडेसिविर इंजेक्शन विमानाने घेऊन येत गरजूंना देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ जारी करून माझ्या मैत्री संबंधाचा वापर करत मी इंजेक्शनचा साठा आणत असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. त्यासाठी माझ्यावर कारवाई होईल की, नाही हे मला माहीत नाही. तसेच खाजगी विमानाने हे इंजेक्शन आणतो असं सुजय विखे यांनी स्पष्ट केलं होतं. या सर्व प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुजय विखे यांनी आणलेले सर्व रेमडेसिविर ताब्यात घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सुजय विखे यांनी आणलेल्या दहा हजार इंजेक्शनचा साठा ताब्यात घ्यावा, असा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने काढला असून खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी दिल्लीवरून चार्टर्ड प्लेनने इंजेक्शन आणलेले  10000 इंजेक्शन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन ते गरजूंना लवकरात लवकर वाटप करावे असे आदेश दिले आहेत.

शेअर करा
Exit mobile version