Site icon सक्रिय न्यूज

महाराष्ट्राला आज मोठा दिलासा, रुग्ण संख्येत लक्षणीय घट…..!

महाराष्ट्राला आज मोठा दिलासा, रुग्ण संख्येत लक्षणीय घट…..!

मुंबई दि.२६ –  राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे.  प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे.

मागच्या कांही दिवसांपासून 60 ते 65 हजारांच्या सरासरीने रुग्ण वाढ होत असताना गेल्या 24 तासात राज्यात 48 हजार 700 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं पाहायला  मिळालं. आज 524 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असताना आज हे दिलासादायक चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर, मुंबई आणि पुण्यातुनही काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर आलं आहे. रुग्णवाढीच्या संख्येपेक्षा तिकडे बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे.

शेअर करा
Exit mobile version