Site icon सक्रिय न्यूज

आरोग्य वर्धिनी उपकेंद्र माळेगाव येथे कोविड-19  लसीकरण मोहिमेस सुरवात……..!

आरोग्य वर्धिनी उपकेंद्र माळेगाव येथे कोविड-19  लसीकरण मोहिमेस सुरवात……..!
केज दि.२७ – तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र युसुफवडगाव अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र माळेगाव येथील दवाखान्यात सोमवारी सकाळी 10 वाजता कोविड लसीकरणाची सुरवात करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी न घाबरता कोविड लस घ्यावी व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन माळेगाव चे उपसरपंच शरद दोडके यांनी  केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्रोही भालेराव व माळेगाव ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.
                 जिल्ह्यात सध्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील दीर्घ आजार असलेल्या व्यक्ती व ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शासकीय लसीकरण केंद्र सुरु असून याठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. युसूफ वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत माळेगाव उपकेंद्रावर लसीकरण मोहीम सुरु झाली असून पहिल्याच दिवशी गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. पहिल्याच दिवशी दुपारी ४.३० वाजेपर्यंत गावातील 140 व्यक्तींनी कोरोनाची लस टोचून घेतली.
               ग्रामस्तरावर आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावामध्ये लसीकरणाविषयी माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरण सुरु झाल्यापासूनच नागरिक स्वयंस्फूर्तीने लसीकरण केंद्रावर येत होते.  लस घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला ३० मिनिटे निगराणीत ठेवण्यात आले. यादरम्यान कोणालाही त्रास झाला नाही. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले.
कोविड 19 लसीकरण सदर मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकासआठवले,  युसुफवडगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्रोही भालेराव, डॉ.अजित देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे.
                      आरोग्य वर्धिनी उपकेंद्र माळेगाव अंतर्गत माळेगाव, बोबडेवाडी, गोटेगाव,मोटेगाव,गांजी या गावातील  नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन स.आरोग्य अधिकारी डॉ .निखिल भालेराव यांनी केले.  लसीकरण मोहीम सुरू करण्यात स.आ.अधिकारी डॉ.सुचिता देशमुख , आरोग्य सेविका राजकन्या सोनवणे,  आरोग्य सेवक दिगंबर चाटे, आरोग्य सेवक श्री. गित्ते,  काळे (H.A.), आशाताई  कौशल्या गुंठाळ, अंगणवाडी सेविका केसरबाई भालेराव यांनी सहकार्य केले.
शेअर करा
Exit mobile version