मुंबई दि.२९ –राज्यात कोरोना रुग्णांची संख्या तसेच नागरिकांचे कोरोनाविषयक गांभीर्य लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाने मोठे वक्तव्य केले आहे. राज्य सरकारने 15 दिवस कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करावा, अशी सूचना हायकोर्टाने केली आहे. तसेच कोरोनाविषयी लोकं अजूनही गंभीर दिसत नाहीयेत. कोरोनाविषयक नियमांचं पालन केलं जात नाहीये. असे असेल तर कोरोनाला कसं रोखलं जाणार असा सवालसुद्धा हायकोर्टाने केला आहे.
राज्यातील कोरोना आणि लॉकडाऊनच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. राज्यातली परिस्थिती पाहिली तर अजूनही लोक बाहेर दिसत आहेत. लोक अजूनही गंभीर नाहीत. त्यामुळे राज्यात पूर्ण 15 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन केल्याशिवाय परिस्थिती आटोक्यात येणार नाही. राज्य सरकारने पूर्ण 15 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू करावा, अशी सूचना न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याकडे केली आहे.