मुंबई दि.२९ – राज्यासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरक्ष: थैमान घातले आहे. दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होतोय. देशभरात कोरोनाचा हाहा:कार सुरु असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशात पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट देखील येण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सर्व जिल्ह्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर टोपे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या चर्चेत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटला परवानगी देण्यात आल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं.
दरम्यान कोरोनाची तिसरी लाट कदाचित जुलै, ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे. त्याआधी आपण ऑक्सिजनबाबत परिपूर्ण असलं पाहिजे. तिसऱ्या लाटेआधी ऑक्सिजन नाही हे ऐकून घेतलं जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या”, अशी माहिती श्री.टोपे यांनी दिली.