अहमदनगर दि.३० – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. त्यात सध्या बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आक्सिजनभावी लोकांना आपला प्राणा गमवाव लागला आहे. अशात इंदुरीकर महाराजांनी कोरोनातून वाचण्याचा खास उपाय सांगितला आहे.
हात वारंवार धुणं, मास्क वापरणं आणि सुरक्षित अंतर राखणं या त्रिसूत्रीसोबत मनात खंबीरपणा ठेवणं हे चौथं सूत्रही आता करोना हरवण्यासाठी आवश्यक बनलं आहे, भीती आणि मनाचा दुबळेपणा हा करोनापेक्षा भयंकर रोग आहे, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने विखे पाटील महाविद्यालयातील वसतिगृहात 400 बेडचे प्रवरा कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे. त्याचं लोकार्पण इंदुरीकर यांच्या हस्ते झालं. यावेळी इंदुरीकर महाराज बोलत होते.
दरम्यान कोरोनाच्या संकटामुळेच सर्वांना माणुसकी कळाली. पैसा आणि संपत्तीपेक्षाही माणसाला देव महत्त्वाचा वाटू लागला. रुग्णाला माणसाची आणि समाजाची गरज वाटू लागलीय. त्यामुळं आता आरोग्याची काळजी घेतानाच भीती आणि मनाच्या दुबळेपणाला दूर करावं लागणार आहे, असं इंदुरीकर महाराज यांनी म्हटलंय