Site icon सक्रिय न्यूज

दुसऱ्या दिवशीही केज शहरात अँटीजन मोहीम सुरू…….!

केज दि.२ – तालुक्यात कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर काल दि. 1 मे पासून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची अँटी जन टेस्ट करण्यात येत आहे. काल दिवसभर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुमारे 216 नागरिकांची टेस्ट करण्यात आली त्यामध्ये 25 लोक कोरोना बाधित आढळून आले होते.
          1 मे पासून सुरू केलेली मोहीम आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. शहरातील भवानी चौकात आज सकाळीच महसूल, नगरपंचायत, आरोग्य व पोलीस कर्मचारी तिथे तैनात असून येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून तपासणी करत आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कुणी बिनकामाचे आढळून आले तर लागलीच त्यांची टेस्ट करण्यात येत आहे. यामध्ये जे नागरिक बाधित आढळून येतील त्यांना कोविड सेंटर मध्ये तर निगेटिव्ह येणाऱ्यांकडून दंड वसूल करून पुन्हा बाहेर न येण्याची ताकीत दिली जात आहे. काल दिवसभरात सुमारे 8 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.
                      दरम्यान सदरील मोहिमेचा आज दुसरा दिवस असून खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांवर चांगला वचक बसला असून रस्त्यावरील वर्दळ नेहमीपेक्षा खूप कमी झालेली दिसून येत असून आजही 11 वाजेपर्यंत 25 पैकी 3 नागरिक पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. सदरील ठिकाणी तहसीलदार दुलाजी मेंडगे,नायब तहसीलदार सचिन देशपांडे,पोलीस निरिक्षक प्रदिप त्रिभुवन,आरोग्य विभागाचे नोडल आॕफिसर डाॕ.दत्तात्रय चाटे,पीएसआय दादासाहेब सिद्धे, नगरपंचायत अधिकारी असद खतीब,अयुब पठाण,अन्वर सय्यद,सय्यद अतिक,दादा हजारे, सह पोलीस कर्मचारी, होमगार्डस परिश्रम घेत आहेत.
शेअर करा
Exit mobile version