बीड दि. 2- आज जाहीर करण्यात आलेल्या 4079 कोरोना अहवालात जिल्ह्यात 1345 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 148 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाई 192, आष्टी 60, बीड 338, धारूर 62 , गेवराई 183 , केज 148, माजलगाव 65 , परळी 106 , पाटोदा 48, शिरूर104 , वडवणी 39 असे रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान केज शहरात दोन दिवसांपासून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात येत असल्याने केज तालुक्यातील रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. मात्र सदरील मोहीम आणखी कांही दिवस चालू ठेवली तर सुपर स्प्रेडर लोक कमी झाल्याने संसर्गाचा धोकाही निश्चित कमी होण्यास मदत होणार आहे.