Site icon सक्रिय न्यूज

कोरोना बाधित व्यक्ती तोंडावर थुंकला, गुन्हा दाखल

कोरोना बाधित व्यक्ती तोंडावर थुंकला, गुन्हा दाखल
केज दि.३ — कोरोना संसर्ग बाधित व्यक्तीने शेत नांगरण्याच्या कारणावरून भांडण करून तोंडावर थुंकूत मारहाण केल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                         केज तालुक्यातील सारुकवाडी येथे सुभाष बळीराम फुंदे व त्याची आई सौ. कुसुम बळीराम फुंदे हे दोघे कोरोना संसर्गित रुग्ण असून ते सध्या गृह विलगिकरणात आहेत.दि.३० एप्रिल रोजी श्रीराम पांडुरंग फुंदे हे व त्यांचा मुलगा दीपक श्रीराम फुंदे हे त्यांच्या शेतात कापसाच्या पऱ्हाट्या उपटीत असताना त्यांच्या शेता शेजारी त्यांचा पुतण्या सुभाष फुंदे हा त्याचे शेत नांगरीत होता. त्या वेळी दिपक फुंदे हा त्याचा चुलत भाऊ सुभाषला फुंदे याला म्हणाला की, तू आमच्या मालकीच्या शेतात नांगर घालू नको. तू तुझे शेत नांगर. असे म्हणताच सुभाषने फुंदे याने दिपक फुंदे यास शिवीगाळ करून अंगावर धावून गेला. तसेच तोंडावरचे मास्क काढून तोंडावर व अंगावर थुंकला आणि सुभाषची आई कुसुम फुंदे, पत्नी उषा फुंदे व वडील बळीराम फुंदे यांनी फिर्यादी श्रीराम फुंदे व त्याचा मुलगा दिपक फुंदे यास काठीने मारहाण करून मुक्का मार दिला.
                      या प्रकरणी श्रीराम फुंदे यांनी दि. २ मे रविवार रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार बळीराम पांडुरंग फुंदे, सुभाष बळीराम फुंदे, कुसुम बळीराम फुंदे, उषा सुभाष फुंदे यांच्या विरुद्ध जीवघेणा साथ रोग परसविणे निष्काळजिपणा व साथ रोग कायद्याचे उल्लंघन करणे, मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गु. र. नं. २२०/२०२१ भा. दं. वि. २६९, २७०, २७१, ३२३, ५०४, ५०६, ३४ व आपत्ती व्यवस्थापन कायदा ५२ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version