Site icon सक्रिय न्यूज

उद्यापासून केज येथे 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे होणार लसीकरण – डॉ. विकास आठवले

उद्यापासून केज येथे 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे होणार लसीकरण – डॉ. विकास आठवले
केज दि.३ – जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवातीच्या टप्प्यात सुरुवात करण्यात आली होती. मात्र आता 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला असून त्याची सुरुवात केज उपजिल्हा रुग्णालयात उद्या (दि.4) पासून होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली.
           18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याचे या पूर्वीच सांगितले होते. त्यानुसार तालुक्यातील अनेक नागरिकांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे. मात्र ज्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे, ज्यांनी शेड्युल करून बुकिंग केली आहे व ज्यांना ज्या तारखेचा मेसेज आलेला आहे त्याच 200 नागरिकांचे लसीकरण होणार आहे. म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे व ज्यांना चार मे या तारखेचा मेसेज आलेला आहे त्यांनीच लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयात हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे इतरांनी म्हणजेच ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले नाही अश्या नागरिकांनी दवाखान्यात येऊन विनाकारण गर्दी करू नये असेही डॉ.आठवले यांनी सूचित केले आहे.
शेअर करा
Exit mobile version