Site icon सक्रिय न्यूज

कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हाधिकारी यांनी काढले नवीन आदेश

कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हाधिकारी यांनी काढले नवीन आदेश
बीड दि.४ – बीड जिह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. सध्या लागू असलेले निर्बंध अपुरे पडत असल्याने यामध्ये आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद जगताप यांनी जारी केले आहेत.
                 यामध्ये बुधवार, गुरुवार व शुक्रवार (दिनांक ०५/०५/२०२१, ०६/०५/२०२१ व ०७/०५/२०२१) या दिवशी केवळ सर्व औषधालये ( Medical), दवाखाने, निदान क्लिनीक, लसीकरण केंद्रे, वैद्यकिय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा, ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा इ. उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत. दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ७.०० ते ११.०० वाजेपर्यंत सुरु राहील. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील. तर बँकेचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते दु.१२.०० वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय व्यवहारासाठी सुरु राहील. शनिवार व रविवार रोजी (दिनांक ०८/०५/२०२१ व ०९/०५/२०२१) जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना (किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटन विक्रीचे दुकाने, बेकरी व कृषीशी
संबंधित इ.) केवळ ०७.०० ते ११.०० या वेळेत चालू राहतील.
                     तसेच शनिवार व रविवार रोजी (दिनांक ०८/०५/२०२१ व ०९/०५/२०२१) केवळ हातगाड्यावर फिरुन फळांची विक्री सायकाळी ०५.०० ते रात्री ०७.०० या वेळेत करता येईल. इत्यादी कडक आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेशात करण्यात आले आहे.
शेअर करा
Exit mobile version