Site icon सक्रिय न्यूज

कोरोनाची दुसरी लाट लवकरच ओसरणार – डॉ.तात्याराव लहाने

कोरोनाची दुसरी लाट लवकरच ओसरणार – डॉ.तात्याराव लहाने

मुंबई दि.४ – कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं असून त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार?, पहिल्याप्रमाणे कधी सर्व सुरळीत होणार?, असे प्रश्व लोकांना पडले आहेत. यावर राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलासादायक माहिती दिली आहे.

जगातील इतर देशांच्या अभ्यासानुसार कोरोना 90 दिवसांनी कमी होत असतो. त्यामुळे 15 मे ते 25 मे च्या दरम्यान कमी होताना दिसेल, असं तात्याराव लहाने यांनी सांगितलं आहे.  तर दुसऱ्या लाटेत  तरूण लोक जास्त प्रमाणात संक्रमित दिसून येत आहेत. वाढता धोका लक्षात घेता आता 18 वर्षापर्यंत लसीकरण होणार आहे, त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणार असल्याचं लहाने म्हणाले. देशात 5 नव्हे तर 1 हजार स्ट्रेन आढळले आहेत. आपल्याला फक्त हे बघायचं आहे की हा स्ट्रेन जास्त संसर्ग वाढवणारा आहे का?, तो शरीरावर जास्त परिणाम करणारा आहे का?, असे स्ट्रेन प्रत्येक 3 महिन्यांनी आढळतात. त्यामुळे या नव्या स्ट्रेनचा अभ्यास सध्या सुरू ठेवला असल्याचं लहाने यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, साथीच्या रोगांमध्ये व्हायरसची ताकद सतत वाढत असते. व्हायरस आपल्यात बदल करत असतो. यामुळे कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे आज सांगू शकत नाही. कितीही लाटा आल्या तरीही महाराष्ट्र खंबीर आहे. पुरेशी तयारी आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आपण तयारी केली आहे, असं लहाने यांनी म्हटलं होतं.

शेअर करा
Exit mobile version