Site icon सक्रिय न्यूज

मराठा समाजाचा पुन्हा एल्गार, बीडमधून निघणार पहिला मोर्चा……!

मराठा समाजाचा पुन्हा एल्गार, बीडमधून निघणार पहिला मोर्चा……!

People wave flags as they take part in a protest, organised by Maharashtra state's Maratha community, to press their demands for reserved quotas in government jobs and college places for students in Mumbai, India, August 9, 2017. REUTERS/Shailesh Andrade TPX IMAGES OF THE DAY - RTS1B0YU

बीड दि.६ – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे. बीडमध्ये आज मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झालं. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.  

 

               

शेअर करा
Exit mobile version