केज दि.६ – मागच्या बऱ्याच दिवसांपासून केज शहरातील बंद असलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बंद च्या काळात झालेले काम उखडून गेले होते त्याची दुरुस्ती करून कामाने वेग घेतला असून शासकीय इंजिनिअर कौशल झा यांच्या मार्गदर्शनाखाली काम होत आहे.
केज शहरांतर्गत मागच्या अनेक महिन्यांपूर्वी सुरू झालेले काम मध्यंतरी बंद झाले होते. शहरातील कानडी चौक ते बसस्थानक दरम्यान जे कांही काम झाले होते त्यावरून बंदच्या काळात मोठया प्रमाणावर वाहतूक झाल्याने खडी उखडली असल्याचे सक्रीय न्युज च्या माध्यमातून समोर आणले होते. मात्र त्याची दखल घेत संबंधित कंपनीने तात्काळ खराब झालेल्या रस्त्याची डागडुजी करून काम सुरू केले असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक दरम्यान शासकीय इंजिनिअर कौशल झा यांच्या देखरेखीखाली एका बाजूने दुसरा थर टाकण्यास प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.
दरम्यान शहरांतर्गत सुरू झालेले काम आता पूर्ण होईपर्यंत बंद होणार नसल्याची व काम तात्काळ करून घेणार असल्याची माहिती कौशल झा तसेच एचपीएम चे मॅनेजर श्री.शिंदे यांनी दिली.