Site icon सक्रिय न्यूज

आरोग्य विभागात 16000 पदांची तातडीने भरती होणार – राजेश टोपे

आरोग्य विभागात 16000 पदांची तातडीने भरती होणार – राजेश टोपे

मुंबई दि.६ – राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः कहर केला असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणा मात्र अपुरी पडत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य विभागात तब्बल 16000 पदे भरण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली

आरोग्य विभागातील 16 हजार पदे तातडीने भरली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. या 16 हजार पदांमध्ये क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती केली जाणार आहे. तर अ आणि ब वर्गातील प्रत्येकी 2 हजार अशी 4 हजार पदे भरली जाणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचंही टोपे म्हणाले.

दरम्यान  कोरोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्ट महिन्यात येण्याची शक्यता आहे. त्याची पूर्वतयारी राज्यशासनाकडून केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्याला त्याबाबत स्पष्ट सूचना दिलेली आहे. बेड, ऑक्सिजन तसंच मनुष्यबळाच्या बाततीत आपण सज्ज असलं पाहिजे, असे आदेश आरोग्य मंत्री या नात्याने मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. असे टोपे म्हणाले.

शेअर करा
Exit mobile version